K-DMC मध्ये नाराजीचा सूर; माजी सभागृह नेत्यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

Dec 29, 2025 - 14:49
Dec 29, 2025 - 14:50
 0  0
K-DMC मध्ये नाराजीचा सूर; माजी सभागृह नेत्यांचे  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

कल्याण–डोंबिवली महापालिकेतील (K-DMC) राजकारणात सध्या अंतर्गत नाराजी उफाळून येताना दिसत आहे. महापालिकेतील माजी सभागृह नेत्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या पत्रात त्यांनी आपण कट्टर कार्यकर्ते असूनही सातत्याने दुर्लक्षित केले जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही आर्थिक सक्षम नसल्यामुळे आणि राजकारणातील बदलत्या समीकरणांमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पत्र महत्त्वाचे मानले जात असून, K-DMC मधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्रकरणाचा पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow