कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट व मनसे एकत्र
कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) एकत्र येण्याची हालचाल सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांचे नेते, इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी एकत्र चर्चा करत असून, निवडणूक रणनीती आखली जात आहे.
या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता असून, नगरसेवक निवडून येतील यासाठी संयुक्त प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ठाकरे गट, मनसेचे नेते तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याने स्थानिक राजकारणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या एकत्र येण्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
What's Your Reaction?